TAKE ME HOME – MRATHI
₹320.00
LANGUAGE:- MARATHI
AUTHOR:- RASHMI BANSAL
PAGES:-365
PUBLISHER:- MEHTA PUBLISHING HOUSE
1 in stock
CompareDescription
किरीट देशपांडे यांनी नागपुरात राहून आपलं व्यवसायाचं स्वप्न पूर्ण केलं… चंदूभाई विराणी यांनी राजकोटमधून सुरुवात करून ‘ग्लोबल’ उद्योग साकारला… दीपक दाधोटी यांनी बेळगावमधून घेतलेली ‘उद्योग-भरारी’ देश-विदेशांत पोहोचली… या सगळ्यांना हे जमलं; तर मग तुम्हाला का नाही जमणार? या पुस्तकात आहेत आपल्या मातीशी इमान राखत उद्योगांची उभारणी करणाऱ्या २० उद्योजकांच्या विलक्षण प्रेरक कहाण्या. भारतातल्या लहानशा खेड्यांमधून या उद्योजकांनी आपल्या उद्योगाची सुरुवात केली, आणि ते जागतिक स्तरावर नेले. विशेष म्हणजे त्यासाठी त्यांनी स्थानिक पातळीवरील गुणवान मंडळींच्या गुणांचाच कौशल्याने उपयोग करून घेतला, आणि नवीन रोजगारही निर्माण केला. त्यांनी सिद्ध केलं की, एक चांगला उद्योग उभारण्यासाठी तुम्ही मोठ्या शहरांमध्येच असलं पाहिजे असं काही नाही. त्यांनी दाखवून दिलं की, तुमच्याकडे योग्य दृष्टिकोन, ध्येयवेड आणि जिद्द असेल तर तुम्हीही यशस्वी उद्योजक होऊ शकता; तुम्हीही तुम्हाला हवं ते करू शकता; काहीतरी नवीन घडवू शकता; तुमचा स्वत:चा असा यशोमार्ग निर्माण करू शकता — हा मार्ग ‘मायमाती’तून सुरू होणारा… ‘ग्लोबल’ आकाशाला गवसणी घालणारा…!
Reviews
There are no reviews yet.