SWAMI VIVEKANAND – BHARATATIL GURU SHISHYA PRAMPARECHI MASHAL (MARATHI)
₹190.00
Language:- Marathi
Author:- Sirshree
Pages:- 152
Publication :- Sakal Prakashan
1 in stock
CompareDescription
नरेंद्र ते स्वामी विवेकानंद: एक विलक्षण प्रवास
खरे तर श्री रामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंद हे परस्परभिन्न प्रकृतीचे महामानव! पण ‘विजातीय ध्रुवांमध्ये आकर्षण असते’ या विज्ञानाच्या न्यायानुसार ते एकत्र आले. एखादा प्रवाह जसा सागराला येऊन मिळावा आणि तोच प्रवाह एका नव्या सागराच्या रूपाने पुन्हा प्रकट व्हावा, तसे या दोघांबाबत घडले. गुरूंचा समृद्ध आणि संपन्न वारसा लाभणे सोपे असते, पण तो समर्थपणे पुढे चालवून त्यात मौलिक भर घालणे हे काम महाकठीण! विवेकानंदांनी सर्वधर्म संमेलनाच्या जागतिक व्यासपीठावरून श्री रामकृष्ण परमहंसांच्या विचारांचा अक्षरश: उद्घोष केला. विचारांच्या रूपाने आपल्या गुरूंचे चिरंतन स्मारक त्यांनी जनमानसात उभे केले. परस्परांचे उन्नयन घडवून उभयतांना पूर्णावस्थेला नेणारा आधुनिक भारतातला हा गुरु-शिष्य स्नेह म्हणजे एक आश्चर्यच नव्हे का?
निर्भयता, तेज, विवेक, करुणा, प्रेम, आत्मविश्वास, आत्मनिर्भरता, प्रबळ इच्छाशक्ती, श्रद्धा, मानवता, बुद्धीचा सर्वोच्च विकास, शुद्ध चारित्र्य… या आणि अशा अगणित गुणांचं भांडार म्हणजे स्वामी विवेकानंद. पण स्वामी विवेकानंदांचे सर्वगुणसंपन्न असणे गुरूंच्या कृपाशीर्वादाशिवाय शक्य होते का? रामकृष्ण परमहंसांसारखे गुरू लाभताच नरेंद्रच्या जीवनात ‘नरेंद्र ते स्वामी विवेकानंद’ हा विलक्षण प्रवास सुरू झाला. प्रस्तुत पुस्तकात नेमका हाच प्रवास शब्दबद्ध करण्यात आला आहे. इंटरनेटच्या विश्वात हरवलेल्या आजच्या तरुण पिढीला दिशा देण्यासाठी आणि चारित्र्यसंपन्न युवा पिढी घडवण्यासाठी प्रस्तुत पुस्तक निश्चितच उपयुक्त ठरेल.
Reviews
There are no reviews yet.