Welcome to Online Book Shopping

Mahatma-Bhakta-Kavi Sarvancha Naamdeo

180.00

Language:- Marathi

Author:- Sirshree

Pages:- 136

Publisher:- Sakal Prakashan

Categories: ,

1 in stock

Compare

Description

प्रत्येकाचं नाव देव आणि प्रत्येकाची नाव नामदेव या जगाला मायेचा भवसागर म्हटले आहे, ज्यात अधिकतर लोक बुडतात. काही थोडेच लोक हा भवसागर पार करून मुक्तीच्या उद्दिष्टापर्यंत पोहोचतात. संत नामदेवांची नाव ही अशी नाव (भक्ती) आहे, जी प्रत्येकाला या ध्येयापर्यंत पोहोचवू शकते. संत नामदेवांचे नाव आणि त्यांची नाव ही अशीच भक्ती व ज्ञानाची जोडी आहे. या पुस्तकाच्या माध्यमातून आपण त्यांच्यासह या नावेत बसून त्यांचं चरित्र समजून घेत, त्यांनी दिलेलं मार्गदर्शन आत्मसात करत, त्यांनी रचलेल्या अभंगातून अमृतानंद घेत, आनंदासह मुक्तीच्या ध्येयापर्यंत पोहोचू शकतो. सरश्री म्हणतात, ‘हर एक का नाम ‘‘देव’’ है और नामदेव सबका है (केवल मराठी जाननेवालों का नहीं).’ याचाच अर्थ, प्रत्येकात देव (ईश्वर) सामावलेला आहे. सर्वांमध्ये ईश्वर आहे परंतु आपण ईश्वराच्या शोधात सर्वत्र भटकतो आणि सर्वांप्रति दुजाभाव बाळगतो. संत नामदेवांनी आपल्या अभंगांद्वारे या सत्याशी उत्कृष्टरीत्या परिचित केलंय. परमेश्वराला मूर्तीत बघण्याऐवजी आपल्या देहरूपी मूर्तीमध्ये त्याचं दर्शन घेण्याची किमया त्यांनी साधली. आज इतक्या वर्षांनंतरही त्यांचे अभंग तितकेच उपयुक्त आहेत, जितके सातशे वर्षांपूर्वी होते. संत नामदेवांच्या जीवनात अनेक चमत्कार घडले. ज्यावर विश्वास ठेवणे आजच्या पिढीला अवघड जाते. या पुस्तकात आपल्याला चमत्कारांमागचं रहस्य तसेच आपल्या जीवनात घडणार्‍या चमत्कारांकडे सहजतया बघण्याची नवी दृष्टी लाभणार आहे. चला तर मग, तयार होऊ या नामदेवांच्या नावेत बसून भक्ती आणि आनंदाची यात्रा करण्यासाठी, जिचे ध्येय आहे- मुक्ती.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Mahatma-Bhakta-Kavi Sarvancha Naamdeo”

Your email address will not be published. Required fields are marked *

Quick Navigation
×
×

Cart