Kaljat Dhavtoy Sasa (Firasti)
₹140.00
Language:- Marathi
Author:- Uttam Kamble
Pages: 111
Publication:- Sakal Prakashan
2 in stock
CompareDescription
काळजात धावतोय ससा ‘
उत्तम कांबळे यांनी लिहिलेल्या’ काळजात धावतोय ससा ‘ या लेखसंग्रहात आजच्या काळातल्या आतून-बाहेरून असुरक्षित असणाऱ्या माणसाचं मनोदर्शन आहे. स्वत:च्या सावलीला देखील भिणाऱ्या सशाची अशी मानसिकता कशामुळे झाली असावी, याचा धांडोळा लेखकानं वेधकपणे घेतला आहे. भोवतालची व्यवस्था, पर्यावरण व आयुष्य तुडवायच्या साऱ्याच वाटा माणसाच्या मनात धावणाऱ्या सशाला घाबरवू लागल्या आहेत. आपल्या प्रखर सामाजिक जाणिवांनी ओतप्रोत लेखनानं वाचकांना खडबडून जागं करण्याचं कांबळे यांचं व्रत वर्तमानात आवश्यकच आहे.
‘गांधी आणि आर्टकल्चर,’ ‘ पुन्हा एकदा दुष्काळ,’ ‘कर्ज चुकवायचंय, उघडा दरवाजा,’ व
‘ मरणाच्या भरपाईची सावली’ यांसारख्या लेखांमधून कांबळे यांनी आधुनिक जगातल्या माणसाच्या जगण्यातला विरोधाभास, अपरिहार्य दु:खाची धग व अगतिकता संवेदनशीलतेने व्यक्त केली आहे.
Reviews
There are no reviews yet.