लेखन म्हणजे सर्जनशीलता, नवनिर्मिती; त्यासाठी अत्यावश्यक असते मनाची तरलता. एखाद्या उत्कट क्षणी कागदावर लेखणी जरी झरझर उमटू लागली तरी कित्येकदा त्यासाठी अबोध मनाच्या पातळीवर फार मोठी तयारी होत असते, आपल्याही नकळत. ‘युरेका’ क्षण जरी अचानक समोर उभा ठाकत असला तरी त्यासाठी विचारमंथन कैक काळ सुरू असतं, जाणीव आणि नेणिवेच्या पातळीवर. ते जेव्हा प्रत्यक्षात साकारतं तेव्हा कुठे आपल्या लक्षात येतं, त्यामुळेच हे अगदी नक्की की, श्री. नातु यांचा आठ कथांचा हा संग्रह अल्पावधीत छापील स्वरूपात उपलब्ध होत असला तरी प्रत्येक कथेची सखोलता आणि व्याप्ती पाहता त्यांच्या मनात गेले कित्येक दिवस किंवा वर्षंसुद्धा सर्वच कथा रेंगाळत असाव्यात.
Reviews
There are no reviews yet.
Be the first to review “Chitra Aani Chehara” Cancel reply
Reviews
There are no reviews yet.