महाराष्ट्राचे लाडके कादंबरीकार हरि नारायण आपटे यांनी १९०२ ते १९०४ या कालावधीत त्यांनी संपादिलेल्या ‘करमणूक’ या मासिकातून चंद्रगुप्त ही कादंबरी क्रमशः प्रसिद्ध केली. कादंबरी प्रसिद्ध होत असताना, ‘करमणूक’चा पुढचा अंककेव्हा येतो व आपण पुढचा भाग केव्हा वाचतो अशी वाचक उत्कंठतेने वाट पाहत असत. दोन हजार वर्षांपूर्वीच्या हिंदुस्थानचे दर्शन घडविणारी ही कादंबरी नंतरच्या काळात लोकप्रिय झाली यात नवल नाही. १९६७ पर्यंत या कादंबरीच्या आठ आवृत्त्याझाल्या आणि एकूण १७ हजार प्रति विकल्या गेल्या. परंतु नवीन पिढीला या कादंबरीची पुरेशी ओळख नाही म्हणून ही कादंबरी मूळ स्वरूपात वरदा प्रकाशन तर्फे पुन्हा सादर करीत आहोत.
Reviews
There are no reviews yet.
Be the first to review “Chandragupt Va Chanakya” Cancel reply
Reviews
There are no reviews yet.