जीवन समजून घेताना
₹225.00
Language:- Marathi
Authore:-
Pages:- 205
Publisher:- Penguin Publication
2 in stock
CompareDescription
पुण्याच्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (सीओईपी)मधून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगची पदवी प्राप्त केल्यानंतर गौर गोपाल दास यांनी काही काळ हिवलेट पॅकर्डमध्ये काम केलं. त्यानंतर, मुंबईच्या उपनगरातील आश्रमात व्रतस्थ साधकाचं जीवन व्यतीत करण्याचा निश्चय त्यांनी केला. गेली बावीस वर्षं ते तिथेच वास्तव्यास आहेत. प्राचीन तत्त्वज्ञान आणि समकालीन मानसशास्त्राची आधुनिकता याविषयीचा त्यांचा व्यासंग दांडगा आहे.
त्या सखोल अध्ययनातून ते आज हजारो शहरांमध्ये जीवन-प्रशिक्षणाचं कार्य समर्थपणे पार पाडत आहेत. या प्रवासात मिळवलेल्या ज्ञानाचा जगभर प्रसार करण्यासाठी गौर गोपाल दास 2005पासून सतत भ्रमंती करत आहेत. विविध विद्यापीठांत, धर्मादाय संस्थांत आणि कॉर्पोरेट विश्वात त्यांचा वावर आहे. एमआयटी पुणे, येथील इंडियन स्टुडंट पार्लमेन्टने गौर गोपाल दास यांना द आयडिअल यंग स्पिरिच्युअल गुरू या सन्मानानं गौरवलं आहे. गौर गोपाल दास म्हणजे हसत-खेळत अध्यात्म मांडणारं जगद्विख्यात व्यक्तिमत्त्व.
Reviews
There are no reviews yet.