पुस्तकाबद्दलची माहिती – हा ‘लाडक्या बाबा’ने आपल्या मुलाशी साधलेला अतिशय मनमोकळा, हृद्य असा ‘पत्रसंवाद’ आहे. आपली मुलं मोठी व्हावीत, शहाणी व्हावीत असं कुठल्या पालकाला वाटत नाही? पण, हल्लीची मुलं ऐकतच नाहीत, आजकाल मुलं वाचतच नाहीत. त्यांच्यावर चांगले संस्कार करायचे तरी कसे?’ हाच असतो पालकांपुढचा यक्षप्रश्न! शिवराज गोर्ले यांचा हा पत्रसंग्रह हे त्या प्रश्नांवरचं रामबाण उत्तर ठरावं! तुमच्या मुलाला/मुलीला हा पत्रसंग्रह भेट म्हणून द्या. ते ही चाळीस पत्रे वाचल्याशिवाय राहणारच नाहीत. त्यांच्या बालमनात येणार्या खूप सार्या प्रश्नांची उत्तरं अगदी साध्या-सोप्या शब्दांत त्यांना इथे मिळतात. हा निव्वळ पत्रांचा संग्रह नव्हे; तुमच्या पाल्यासाठी ही जणू आयुष्यभराची शिदोरी ठरू शकेल. लेखक परिचय – मराठी भाषेतील प्रेरणादायी पुस्तकांचा बादशाह म्हणून ओळखले जाणारे शिवराज गोर्ले नामांकित लेखक असून त्यांची अनेक पुस्तके बेस्ट सेलर्स आहेत. सकाळने प्रकाशित केलेली पुस्तके — यशस्वी व्हावं कसं?, तुम्ही बदलू शकता… थोडे स्वत:ला… थोडे जगाला…, निर्णय घ्यावा कसा? घडवा स्वत:ला, फुलवा स्वत:ला.
Reviews
There are no reviews yet.