Welcome to Online Book Shopping

ASWASTH PARV- VEDH JAGTIK GHADAMODINCHA

399.00

Language:- Marathi

Author:- Shriram Pawar

Pages:- 330

publication:- Sakal Prakashan

Categories: ,

2 in stock

Compare

Description

एका बाजूला प्रचंड कुतूहल वाटावं आणि दुसऱ्या बाजूला प्रचंड अस्वस्थता असावी अशा काळातील जागतिक घडामोडींचा वेध प्रस्तुत लेखन घेतं .

प्रगतीसाठीची धोरणं  राबवताना जागतिक अर्थव्यवस्थेचा भाग सर्वांना व्हावंच लागेल ; ही वाटचाल उदारमतवादी लोकशाही बळकट करणारी ठरेल ; लोक जगाच्या व्यवहारात इतके सामावले जातील , की ते जागतिक नागरिक म्हणवणं  पसंत करतील ; त्यातून राष्ट्र – राज्य संकल्पनेतील सीमारेषाही धूसर व्हायला लागतील ; या आदर्शवादाला ,त्यातील गृहीतकांच्या फुग्याला तीस वर्षांच्या वाटचालीनंतर टाचणी लावणारं वळण जागतिक व्यवहारात आलं आहे.
हे का आणि कसं घडत गेलं ,या प्रश्नाचा शोध हे पुस्तक घेतं .
वंश ,धर्म अशा बाबींवर आधारलेला बहुसंख्यांकवाद  जगाच्या अनेक भागांत बोकाळतो आहे.
अल्गोरिदम ,आर्टिफिशयल इंटेलिजन्स ,रोबोटिक्स ,नॅनो टेक्नॉलॉजी आणि डेटा सायन्स ही वर्चस्वाच्या लढाईची हत्यारं बनताहेत . यातून निर्माण होणारे नवे ताण ,नवी स्पर्धा ,जगाच्या अस्वस्थतेत भर टाकते  आहे. या पार्श्वभूमीवर ‘क्वाड ‘सारखा गट बळकट होतो आहे. त्यातून इंडो-पॅसिफिक सागरी क्षेत्र हे प्रमुख स्पर्धा होण्याची चिन्हं दिसताहेत .
हे पुस्तक ज्या काळातील घडामोडींवर  आधारित आहे त्याला अस्वस्थतेचे असे अनेक पदर आहेत . या घटना -घडामोडींचा वेध आणि विश्लेषण हा या पुस्तकाचा गाभा आहे .

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “ASWASTH PARV- VEDH JAGTIK GHADAMODINCHA”

Your email address will not be published. Required fields are marked *

Quick Navigation
×
×

Cart