Welcome to Online Book Shopping

Abundance | Vipulta | विपुलता (Marathi)

250.00

Publisher: Goyal Prakashan

Language: Marathi

Anuwad: Nagesh Suravase

Author : Deepak Chopra

Type: Paperback

Pages: 189

Categories: ,

3 in stock

Compare

Description

संपत्तीयोगाकडे नेणारा आंतरिक मार्ग आपल्या भोवतालचे सारे जग कोलमडून पडत असताना, र्‍हास पावत असताना, आपल्या मनामध्ये मानसिक, आंतरिक तसेच आध्यात्मिक परिवर्तन घडणे तसेच विपुलतेच्या दिशेने सतत पुढे पुढे जात राहणे, यांची निकड दीपक चोप्रा आपल्या निदर्शनास आणून देतात. मोठ्या आत्मशोधकतेने वर्तमानातील प्रत्येक क्षण न क्षण संपूर्णपणे जगत, संपत्तीयोग, यशवैभव, परिपूर्णता तसेच परिपक्वतेकडे जाण्यासाठी ते वाचकाला प्रशिक्षित करतात.

योगा, विपुलता आणि सृजनशील बुद्धिमत्ता ही या पुस्तकाची मुख्य सूत्रे आहेत. ‘धर्म आणि पैसा’, ‘पैसा आणि काम’, ‘सृजनशील बुद्धिमत्तेचा प्रवाह’ तसेच ‘आनंदाचा स्त्रोत’, ‘शक्तीशाली कृतीशीलता’, ‘इच्छांचे मार्ग’ यावर चिंतन व्यक्त करीत दीपक चोप्रा वाचकाला आध्यात्मिक भविष्यवेधी वाटचालीची दिशा व दृष्टी ते सूचीत करतात. प्रस्तुत पुस्तकाच्या निमित्ताने दीपक चोप्रा यांनी ‘विपुलता आणि आंतरिक पथ-मार्ग’ त्यांनी अत्यंत हळूवारपणे उलगडून दाखवला आहे.

आपल्या आतील विपुलतेचा शोध घेण्यातच जीवनाची धर्मशीलता आहे, असे दीपक चोप्रा यांना वाटते. त्याचबरोबर भारतीय धर्म व संस्कृतीतील सप्तचक्र पद्धत, षटचके्र, कुंडलिनी जागृती, हटयोग-ध्यान, अंतर्दृष्टी, अंतर्ज्ञान या सर्वांचा उहापोह दीपक चोप्रा यांनी या निमित्त केला आहे. तो मूळातूनच वाचण्यासारखा आहे. दीपक चोप्रा, एम डी., ‘चोप्रा फाउंडेशन’चे संस्थापक! जगविख्यात भारतीय-अमेरिकन बेस्ट सेलर लेखक! आजवर त्यांचे ८०च्या वर ग्रंथ प्रसिद्ध झाले असून, त्यांची गणना जगातील आध्यात्मिक लेखकांमध्ये मोठ्या आदराने केली जाते. जवळ जवळ ४६ भाषांत त्यांचे ग्रंथ अनुवादित झालेले आहेत.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Abundance | Vipulta | विपुलता (Marathi)”

Your email address will not be published. Required fields are marked *

Quick Navigation
×
×

Cart